Home टेक्नोलॉजी चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरच्या साइटला मिळाले शिवशक्ती हे नाव

चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरच्या साइटला मिळाले शिवशक्ती हे नाव


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने चंद्रावर यशस्वी लँडिग केली होती. चांद्रयान-३ यांच्या विक्रम लँडर ज्या ठिकाणी लँड झाले होते. त्या साइटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नाव दिले होते. २३ ऑगस्ट २०२३ रोजी विक्रमच्या ऐतिहासिक चंद्रावर उतरल्यानंतर तीन दिवसांनी २६ मार्च रोजी बंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क येथे मोदींनी ही घोषणा केली होतीआता सात महिन्यानंतर वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टीम नामांकनाने १९ मार्च रोजी या नावाला मंजूरी दिली आहे.

भारतीय पौराणिक कथांमधला संयुग शब्द जो प्रकृतीचे पुल्लिंगी (शिव) आणि स्त्रीलिंगी (शक्ती) द्वैत दर्शवतो. शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्ती आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना देखील देतो, संपूर्ण जग भारताच्या वैज्ञानिक भावना, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक स्वभावाचे सामर्थ्य पाहत आहे आणि स्वीकारत आहे, असे त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.


Protected Content

Play sound