Home क्राईम रामेश्वर कॉलनीत तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

रामेश्वर कॉलनीत तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

0
34
aropi pavan
aropi pavan

aropi pavan

जळगाव प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील 21 वर्षीय तरुण हातात अडीच फुटाची लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (वय 21) रा. रामेश्वर कॉलनी हा 2 फूट 4 इंची लोखंडी तलवार आदित्य हॉटेल चौकातील परिसरात घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शना खाली स. फौ. अतुल वंजारी, स.फौ. रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर यांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातील लोखंडी तलवार हस्तगत केले आहे. पोलीस नाईक निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात पवन सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound