अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जैतपिर येथील पिण्याची पाणी टाकी जीर्ण झाली होती. अशुद्ध पाणी पिण्याची भिती उदभवली असता, नवीन पाणी टाकी मंजूर करून काम आता पूर्णत्वास येत आहे, तसेच निकामी व पडके बस स्टँड ही जागा रिकामी असुन येथे गाव सुशोभीकरण करावे म्हणुन येथे महापुरूष हिंद कुलभुषण विर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. तरी मुकेश राजपुत यांनी केलेल्या मागण्याना अखेर यश आले असुन त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आभार मानले.
जैतपिर येथे नवीन जलकुंभ उभारण्यात येणार
10 months ago
No Comments