जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट जवळील गुरुनानक ट्रेडर्स दुकान फोडून २ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप नानकराम रामचंदानी (वय-४२, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्यांचे जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट येथे गुरुनानक ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात सबमर्सिबल पंप व इतर सामान ठेवले जाते. नेहमीप्रमाणे प्रदीप रामचंदानी यांनी १२ मार्च रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल आणि रोकड चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी बुधवारी १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडतील आली आहे. याप्रकरणी प्रदीप रामचंद यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.