जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । वाढीव परीक्षा शुल्क कमी करावी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी एका महिन्याच्या आत पुर्नपरिक्षा महाविद्यालयात घेण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरूवारी १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता मु.जे.महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा दिल्याने महाविद्यालय परिसर दणाणून सोडले होते.
दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मु.जे. महाविद्यालयात गरीब व मध्यवर्गीय विद्यार्थी हे शिक्षण घेत आहे. महाविद्यालय प्रशासनाने गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता परिक्षा शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक संकटात सापडले आहे. त्याचबरोबर बॅकलॉग विद्यार्थ्यांचे एका महिन्याच्या आता परीक्षा व्हावी यासाठी विद्यार्थ्याकडून वेळोवेळी निवेदन देवून मागणी केली होती. शहरातील इतर महाविद्यालयात स्वायत महाविद्यालयात पुर्नपरिक्षा घेण्याची तरतूद आहे. त्याच धर्तीवर मु.जे.महाविद्यालयाच्या प्रशासनाने देखील पुर्नपरिक्षा घेवून विद्यार्थ्यांचे आर्थीक नुकसान टाळावे अशी मागणी केली. या दोन्ही मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मु.जे. महाविद्यालयासमारे गुरूवारी १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. या ठिय्याा आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे पहायला मिळाले.