मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत अनेक रेल्वे स्थानक आहेत. या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार राहूल शेवाळे यांनी बैठक घेतली आहे. या रेल्वे स्थानकांची नावे ब्रिटिश कालीन आहे ती नावे बदलण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
यात करीरोडचे नाव लालबाग, मुंबई सेंट्रलचे नाव नाना जग्गनाथ शंकर शेठ, मरीनलाईन्सचे मुंबादेवी, डॉकयार्डचे माझगाव, चर्नीरोडचे गिरगाव, कार्टनगरीनचे काळाचौकी आणि किंग्ज सर्कलचे तिर्थकर पार्श्वनाथ या स्टेशनांचा समावेश आहे. ही नावे लवकरात लवकर बदलण्यात येतील अशी माहिती खासदार राहूल शेवाळे यांनी दिली आहे.