जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटजवळील समृध्दी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या विवाहितेला पैशांसाठी मारहाण करून छळ करत तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटजवळील समृध्दी अपार्टमेंट येथे नसरीन वसीम पिंजारी वय ३० या विवाहिता पती वसीम छोटू पिंजारी, सासू, सासरे, नणंद यांच्यासोबत वास्तव्याला आहे. गेल्या काहि दिवसांपासून विवाहिता नसरीन पिंजारी आणि पती वसीम पिंजारी यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहे. विवाहितेला माहेराहून पैसे आणि धान्य आणावे अशी मागणी केली जात होती. यासाठी विवाहितला पती व सासरच्या मंडळींकडून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करत छळ केला जात होता. शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरात पुन्हा वाद झाला. यात पतीसह सासरच्या मंडळींनी राहत असलेल्या घरातच्या तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला खाली ढकलून दिले. यात विवाहितेचे दोन्ही पाय, उजवा हात, छाती, पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तिला शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच जळगाव येथे दाखल झाले. दरम्यान, तिला होत असलेल्या मारहाण आणि छळ संदर्भात शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रात्री ९ वाजता पती वसीम छोटू पिंजारी, सासरा छोटू उमर पिंजारी, सासू हसीना छोटू पिंजारी, ननंद किरिष्मा अकिल पिंजारी सर्व रा. समृध्दी अपार्टमेट, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल हे करीत आहे. या प्रकरणात पतीसह इतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.