जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलिस ठाण्याच्या तीन कर्मचाऱ्यांची तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील यांचा समावेश आहे.
अमळनेर पोलिस ठाण्यात असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री काढले. यामध्ये शरद पाटील यांची भडगाव पोलिस ठाणे, दीपक माळी यांची बोदवड पोलिस ठाणे, रवींद्र पाटील यांची अडावद पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्याची व आपसातील चढाओढीचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचली होती. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली व तीनही जणांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात जावे लागले.
अमळनेर येथील एका जणाच्या मृत्यूनंतर दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेशन विभागाने (सीआयडी) वरील तीन जणांना बोलवले होते. त्यानुसार २६ फेब्रुवारी रोजी त्यांची चौकशी करण्यात आली होती. यासोबतच वाढत्या तक्रारी, यातूनच या बदल्यात करण्यात आल्याची चर्चा आहे.