Home Cities जळगाव पाच किलोमीटरच्या ‘महासंस्कृती रन’ला उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दाखवला झेंडा

पाच किलोमीटरच्या ‘महासंस्कृती रन’ला उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दाखवला झेंडा

0
81


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महासंस्कृती महोत्सवानिमित्त रविवारी दि.3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता ‘महासंस्कृती रन ‘ ठेवण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘ महासंस्कृती रन ‘ सागर पार्क येथून सुरुवात झाली. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे उपस्थित होते.

हा विशेष रन सागर पार्क येथून सुरु होऊन खानदेश सेंट्रलला वळसा घालून पुन्हा सागर पार्क असा पाच किलोमीटर अंतराचा होता. महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रम झाले त्यात हा ‘महासंस्कृती रन’ हा पण एक होता.


Protected Content

Play sound