मधुस्नेह संस्था परिवारातर्फे विद्यार्थांचा गुणगौरव

WhatsApp Image 2019 06 23 at 4.40.57 PM

रावेर (प्रतिनिधी) रविवार २३ जून रोजी मधुस्नेह संस्था परिवारातर्फे रावेर मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीत चांगल्या गुणांनी उत्तिर्ण यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा थाटात पार पडला . अध्यक्षपदी मधुस्नेह परिवाराचे प्रमुख माजी आ. शिरीष मधुकरराव चौधरी होते . प्रमुख अतिथी म्हणून  राष्ट्रवादी काॕग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , काॕग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अॕड. संदीपभैय्या पाटील होते.  प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग मुंबई महानगरपालिका राजू तडवी, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

दिलीप सूर्यवंशी, राजू तडवी ,रमजान गुरुजी ,संदीपभैय्या पाटील, रवींद्रभैय्या पाटील यांनी मनोगतामध्ये दहावी, बारावीनंतर खरे शिक्षण सूरु होते. ध्येय डोळ्यांत ठेवून नियोजन करा . सोशल मिडियामध्ये गुंतू नका असा सल्ला दिला. शिरीष चौधरी यांनी विद्यार्थांना भावीकार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच हा परिसर शिक्षणाचा बाबतीत समृद्ध आहे त्याला लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे निस्वार्थ प्रयत्न दडलेले आहेत. अध्यक्षीय भाषणात सांगितले की, भविष्यात कोणकोणते सेवाभावी कार्य करणार आहोत याची माहिती माजी आ. शिरीष चौधरी यांनी दिली . सूत्रसंचालन प्रा.जे.जी .ढोले,प्रा.मनिषा पाटील ,प्रा.हेमलता चौधरी ,प्रा.बी.आर.डोळे यांनी केले. प्रास्तविक प्राचार्य डाॅ. पी.आर .चौधरी यांनी केले. यावेळी विद्याथ्यांनी मनोगत व्यक्त केले. यात हार्दिक बेंडाळे म्हणाला की, अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन केले. यशामध्ये आई-वडिल व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. दर्शना चौधरी हीने मनोगतामध्ये यशामध्ये माझी शाळा धनाजी नाना विद्यालय ,खिरोदा येथिल शिक्षक यांनी ममतेने संस्कार दिले व शिरीष चौधरी संस्था चालक दुर्मिळ असतात कारण विद्यार्थांच्या सर्वांगीन विकास व्हावा हा उदात्त हेतू त्यांचा असतो असे मत मांडले. यशस्वितेसाठी मधुस्नेह संस्था परिवाराचे सदस्य , प्राचार्य ,मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले .

 

 

Protected Content