यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुतारवाडा परिसरात भाविभक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या शिवमहापुराण सप्ताहाची पोथी वाचनाने समाप्ती तरूणांनी आयोजीत केलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने झाली.
यावल शहरातील सुतारवाडा या ठिकाणी शिव महापुराण सप्ताहा समाप्तीवर भाविकांसाठी महाप्रसाद ( भंडारा ) चे तरूणांच्या नवदुर्गा दुर्गत सर्व मित्र मंडळाच्या वतीने या प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले, सात दिवस चालणारा हा कार्यक्रम अतिश्य भक्ती भावात संपन्न झाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविकांनी आपली उपस्थिती दिली. अशा या शिव महापुराण कथेचा सातवा दिवसआयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन नवदुर्ग दुर्ग मित्र मंडळ मंडळाचे पदाधिकारी चेतन अढळकर, बापू महाजन, ज्ञानेश्वर नन्नवरे ,संजू पाटील, शिवाजी बारी, शशिकांत देवरे ,नाना महाजन ,बबलू बारी, शेखर बाविस्कर, किशोर नन्नवरे व कथेचे आयोजन पंडित कोळी यांच्याकडून करण्यात आले होते व सर्व सुतारवाड्यातील व संभाजी पेठ मधील मंडळातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.