कार-दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पंकज राजेंद्र मराठे वय-३४ रा. कानळदा जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा येथे पंकज मराठे हा तरूण आपल्या आईवडील आणि दोन भावांसह वास्तव्याला आहे. जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्याची मोपेड दुचाकी वरून गावातील त्याचा मित्र गोपाल वसंत पाटील वय २९ याच्या सोबत जळगाववरून कानळदा येथे घरी जाण्यासाठी निघाले. जळगाव ते कानळदा रोडवरील एका वळणावर भरधाव कार क्रमांक (एमएच १४ पी १५६०) ने जोरदार धडक दिली. या अपघातात पंकज मराठे यांचा जागीच मृत्यू झाला तर गोपाळ पाटील हा गंभीररित्या जखमी झाला. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता पंकज मराठे याला मयत घोषीत केले. तर गंभीर जखमी झालेला गोपाळ पाटील याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंतर रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गावातील नातेवाईक व मित्र मंडळांनी शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान याप्रकरण जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील आणि दिनेश पाटील हे करीत आहे. मयताच्या पश्चात आई इंदूबाई, वडील राजेंद्र नेमचंद मराठे आणि निलेश , संदीप हे दोन भाऊ असा परिवार आहे.

Protected Content