हैदराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलंगणा हायकोर्टाने एका याचिकेवर सुनावणी करताना महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुलीची आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून तिचा वडिलांच्या संपत्तीवरील हक्क नाकारला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे. तसेच याप्रकरणी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.
‘लाईव्ह लॉ’ ने दिलेल्या बातमीनुसार, न्यायमूर्ती एम. जी. प्रियादर्शन यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. भावाने आपल्या बहिणीच्या विरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. कोर्टाने बहिणीच्या बाजूने निकाल दिला आहे. भावाना केलेल्या दाव्याला कोर्टाने चुकीचे ठरवले आहे. हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं की, महिलेची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे तिला वडिलांनी कमावलेल्या संपत्तीमध्ये वाटा मिळू नये अशी मागणी करण्यात आली आहे. आर्थिक स्थिती चांगली आहे या एका कारणासाठी मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवरील दावा कोणी नाकारु शकत नाही.
याचिकाकर्त्याने विरोधाभासी आणि चुकीचे दावे याचिकेमध्ये केले आहेत, असा उल्लेख हायकोर्टाने केलाय. बहिणीच्या लग्नामध्ये मोठा खर्च केल्याचा दावा याचिकेमध्ये भावाने केला होता. मात्र, महिलेच्या लग्नात मोठा खर्च करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच लग्नात खर्च केला जरी असला तरी या कारणामुळे तिचा वडिलांच्या संपत्तीवरील दावा अमान्य करता येणार नाही, असं कोर्टाचं स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिच्या आईने कोर्टामध्ये येऊन जबाब नोंदवला आहे. यात आईने आपल्या पतीची संपती माझ्या मुला-मुलींना अर्धा-अर्धा हिस्सा देण्यात यावी असं म्हटलं होतं, याचा संदर्भ कोर्टाने घेतला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने याचिका फेटाळली