Home Cities जळगाव फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे शिवजयंतीचा उत्साह संचारला

फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे शिवजयंतीचा उत्साह संचारला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फेही शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, डॉ. अनुराग, डॉ. अंकीता दास, डॉ. अभिलीप्सा उपस्थित होते.

डॉ. सुयोग लंकेपिल्लेवाल यांनी शिवगर्जना सादर केली. कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अफजल खान वधाचा देखावा विद्यार्थ्यांनी साकारला. तसेच पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. सुत्रसंचालन तेजस्वीनी व्यंकटवार, सृष्टी लाड, हिमानी सोनार यांनी तर आभार अंकीत राऊत याने मानले. यशस्वीतेसाठी सर्वेश पाटील, प्रतिक लहामगे, सुजय मानकर, शिवम राठोड, नीरज सपकाळे, गणेश दुधभाते, पूजा पुरोहित, श्रृती तांबट, सलोनी किर, स्नेहल राठोड, दामिनी तावडे, खुशी पट्टेबहाद्दूर, सुशांत शिसोदे, गौरव पवार, अमृता देशमुख, ओम चौधरी, वैष्णवी दळवे यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound