Home Cities अमळनेर तरूणाचे बंद घर फोडून ४० हजारांचा ऐवज लांबविला

तरूणाचे बंद घर फोडून ४० हजारांचा ऐवज लांबविला

0
43


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गुरुकृपा कॉलनीत तरुणाचे बंद घर फोडून लोखंडी कपाटातून सोन्याची चीप आणि रोख रक्कम असा ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दर्शन रणजीतसिंग चौधरी (वय-२७, रा. गुरुकृपा कॉलनी, अमळनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दर्शन कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घराचे कुलूप तोडून घराच्या लोखंडी कपाटातून सोन्याची चीफ आणि रोख रक्कम असा एकुण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान दर्शन चौधरी हा गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता घरी आला. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले, आत प्रवेश केला असता घरातील कपाटातून सोन्याचे चिप आणि रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound