Home Cities जळगाव वासुमित्रा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त उत्सव समिती अध्यक्षपदी भूषण सोनवणे तर उपाध्यक्षपदी गणेश सोनवणे

वासुमित्रा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त उत्सव समिती अध्यक्षपदी भूषण सोनवणे तर उपाध्यक्षपदी गणेश सोनवणे

0
354


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील वासूमित्रा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रम यशस्वीतेसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून अध्यक्षपदी भूषण वासुदेव सोनवणे तर उपाध्यक्षपदी गणेश किसन सोनवणे यांची निवड एकमताने करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी जयेश पाटील, सचिवपदी संदीप येवले, खजिनदारपदी राहुल देशमुख सहसचिव पदी विनोद ढमाले यांची निवड करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे.रामेश्वर कॉलनीतील विविध परिसरात हि मिरवणूक असून दुसऱ्या दिवशी दि. २० रोजी संध्याकाळी साडेसात वाजता रूपालीताई सवणे परतुरकर यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन केले आहे. शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यपदी शशिकांत पाटील, देवेंद्र मराठे, बाळा सोनवणे, प्रशांत सोनवणे, मोहन यादव, पंकज राठोड,धिरज केने,केतन सोनवणे शेखर कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound