जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रेडींगमध्ये पैसे गुंतविण्याचे सांगून पाचोरा येथी विमा प्रतिनिधीची तब्बल ९ लाख ५४ हजार ६०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश प्रदीपकुमार संचेती वय-३९ रा. पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते विमा प्रतिनिधी म्हणून काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. १४ नाव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावेळी त्यांनी ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार राजेश संचेती यांनी वेळीवेळी त्यांच्या बँक खात्यातून एकुण ९ लाख ५४ हजार ६०० ऑनलाईन पध्दतीने पाठविले. दरम्यान त्यांनी भरलेल्या पैशांचा मोबदला किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील हे करीत आहे.