Home क्रीडा एस. एल. चौधरी विद्यालयात जागतिक योगदिन साजरा

एस. एल. चौधरी विद्यालयात जागतिक योगदिन साजरा

0
33
WhatsApp Image 2019 06 21 at 9.15.54 PM
WhatsApp Image 2019 06 21 at 9.15.54 PM

WhatsApp Image 2019 06 21 at 9.15.54 PM

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक योगदिनाच्या निमित्ताने समर्पण संस्थेच्या श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात विविध योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तीन वेळा योगा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्या श्रद्धा मुंदडा लढ्ढा या उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थी व उपस्थितांचे सामूहिक योगासने घेण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले आणि पाहुण्यांना विद्यार्थ्यांसोबत योगा करण्याचा मोह आवरता आला नाही आणि श्रद्धा मुंदडा यांनी विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्कार व इतरही अनेक आसने केली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि रोज सकाळी किमान अर्धा तास तरी योगाआसनांचा सराव करावा असे सांगितले. विद्यार्थ्यांनीही योगाचा सराव करण्याची ग्वाही दिली. योगशिक्षिका माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी या सादरीकरणात उत्साहाने सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन आभा तळेले यांनी केले तर आभार रीना चौधरी यांनी मानले. स्वाती फिरके यांनी विद्यार्थ्यांना योगा चे महत्व पटवून दिले. यशस्वीतेसाठी योगशिक्षिका माया पाटील आणि सहशिक्षिका कु. राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना नन्नवरे, उपमुख्याध्यापिका अर्चना उजागरे, पर्यवेक्षिका माधुरी पाटील व शिक्षक वृंद उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound