Home Cities जळगाव कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकपालपदी प्रा. विलास सपकाळ यांची नियुक्ती

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकपालपदी प्रा. विलास सपकाळ यांची नियुक्ती

0
72


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकपालपदी छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग तसेच भारत सरकार यांच्या असाधारण भाग-३ खंड ४ प्रमाणे प्रकाशित केलेल्या राजपत्रानुसार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मान्यतेने प्रा. विलास सपकाळ यांची विद्यापीठाच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रूजू झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षा करीता किंवा त्यांच्या वयाच्या ७० वर्षापर्यंत यात जे आधी असेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती राहील. विद्यापीठाशी संलग्नित तीनही जिल्हयातील महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया लोकपाल यांच्यामार्फत केली जाणार आहे.


Protected Content

Play sound