जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया चा १’लाख च्यावर टप्पा पार केल्याबद्दल जळगाव येथील ‘मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाऊंडेशन’ तर्फे सन-२०१९ या वर्षाचा ‘विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार १६’जून रोजी आमदार.राजुमामा भोळे,माजी महापौर .करीम सालार, .फिरोज शेख व अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ.चव्हाण प्रदान करण्यात आला.
डॉ.चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत १ लाख ५ हजारच्या वरती कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचा टप्पा पार केलेला असुन त्यामध्ये ३० हजार टाक्याच्या तर,७४ हजार बिनटाक्याच्याच्या शस्त्रक्रिया त्यांनी आजवर पूर्ण केलेल्या आहेत. याचबरोबर डॉ.चव्हाण यांनी समाजातील विविध सामाजिक संघटना,संस्था तसेच फाऊंडेशन यांच्या सहकार्याने अत्यंत गरीब,गरजु रुग्ण तसेच माता बालमृत्यू प्रमाण तसेच सुलभ प्रसुती,दिव्यांग बांधवांंसाठीच्या योजना,ज्येष्ठ नागरिक,एड्स निर्मुलन,रक्तदान,नेत्रदान,अवयव दान,व्यसनमुक्ती,इ.कार्यक्रम हिरारीने आयोजित करुन यशस्वी करुन दाखवितात.त्यांनी गेल्यावर्षी जुन-२०१८ मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटन(WHO) तर्फे बँकाॕक मध्ये आयोजित आरोग्य कार्यशाळेमध्ये भारत देशातून विशेषतः महाराष्ट्रातून एकमेव असे आदर्श आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.एन.एस.चव्हाण यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या या अशा विविध आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यांमुळे आजपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते गौरव करण्यात आला आहे.डॉ.एन.एस.चव्हाण,यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार-२०१९ मिळाल्याबद्दल त्यांचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन,सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील,खासदार उन्मेष पाटील,खासदार .रक्षा खडसे, महापौर-सिमा भोळे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्माराम जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष मदन जाधव,राष्ट्रीय सरचिटणीस अनिल पवार,राष्ट्रीय महासचिव वाल्मिक पवार,राष्ट्रीय प्रवक्ता ॲड.अविनाश जाधव,राष्ट्रीय खजिनदार राजेश नाईक,प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष भारत राठोड,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष-सुजाता आडे,जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल नाईक,जिल्हा सरचिटणीस सिताराम पवार,जळगाव महानगराध्यक्ष दयाराम तंवर,मुक्ती फाऊंडेशन चे अध्यक्ष मुकूंद गोसावी, आरोग्यदूत तथा पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व विविध शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.