Home Cities जामनेर महावीर पब्लिक स्कूलमध्ये गुणदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

महावीर पब्लिक स्कूलमध्ये गुणदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

0
50


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील नर्मदा फाउंडेशन संचलित महावीर पब्लिक स्कूल या इंग्लिश मीडियम शाळेत सांस्कृतिक गुणदर्शन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला पहूर पोलीस स्टेशनचे पीआय सचिन सानप, महावीर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष व माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, सचिव दीपक लोढा, संचालक श्याम सावळे, कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव पांढरे, प्रल्हाद वानखेडे, सरपंच अब्बु तडवी, उपसरपंच शरद पांढरे, ग्रा.पं. सदस्य अनिल मोरे, धोंडू देशमुख, सचिन देशमुख, ईश्वर बारी, इरफान शेख यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चिमूरड्यांच्या अदाकारीने उपस्थित मंत्रमुक्त झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकले काहींनी तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर रोख पारितोषिकही दिली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कंडारे मॅडम, नेमाडे मॅडम, चव्हाण सर, असिफ सर, यांच्यासह शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. शाळेचे सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रम करून घेतले. याचबरोबर या कार्यक्रमासाठी महावीर पब्लिक स्कूलमधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound