भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील सर्व रिक्षाचालकांना आरटीओतील काही एजंटांकडुन विनाकारण त्रास दिला जात असुन त्यांच्याकडुन जास्तीचा दंड आकारला जात आहे, असा आरोप रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष तथा पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केला आहे. शहरातील रिक्षा स्टॉपच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, आरटीओ अधिकाऱ्यांच्या एजंटांमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे .रिक्षा चालकांवर वाहतूक नियमांचे खोटे गुन्हे नोंदवुन त्यांच्याकडून दंड वसुल केला जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्व रिक्षा एक दिवस बंद ठेवुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा सोनवणे यांनी यावेळी दिला.