नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताची ट्रॅप शूटर प्रिती रजकने इतिहास रचला. प्रिती रजक भारतीय लष्करातील सुभेदार ही रँक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. प्रिती यापूर्वी भारतीय लष्करात हवालदार या रँकवर होती. तिला पदोन्नती देण्यात आली आहे. याची घोषणा आज झाली. हा क्षण भारतीय लष्करासाठी ऐतिहासिक ठरला.
सुभेदार रजक हिने भारतीय लष्करातील आपला प्रवास हा 2022 मध्ये कॉर्प ऑफ मिलिटरी पोलीस म्हणून सुरू केला होता. तिने आपल्या कामगिरीने सुभेदार पदापर्यंत मजल मारली आहे. भारतीय लष्कराने आपल्या वक्तव्यात म्हटलं की, ‘हावलदार प्रिती रजकला पदोन्नती मिळाल्याचे जाहीर करताना भारतीय लष्कराला खूप अभिमान वाटत आहे. ती एक उत्तम ट्रॅप शूटर आहे. ती आता लष्करात सुभेदार म्हणून कार्य करेल.’