नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परीक्षेची तारीख बदलली असून ही परीक्षा आता ७ जुलै रोजी होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं यासंदर्भात आज अर्थात ९ जानेवारी रोजी नोटीस काढली आहे. उमेदवारांना यासंदर्भातील सविस्तर नोटीस एनबीईच्या वेबसाईटवर पाहता येईल.
नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली जाणार असल्याची अफवा पूर्वी पसरली होती. पण आता एनबीईने अधिकृतरित्या परीक्ष पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी परीक्षा ३ मार्च २०२४ रोजी घेण्यात येणार होती. पण आता नवी तारीख ७ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली आहे. लवकरच याच्या नोंदणीची प्रक्रिया एनबीई कडून सुरु करण्यात येणार आहे.