भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शिवारातील शेतातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आला.
वरणगाव पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील अंजन सोंडे शिवारातील शेतात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहितरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नातेवाईकांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करीत आहे.




