चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | दिव्यांग बांधवांना योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या हरीत ऊर्जेवरील ई रिक्षाच्या ऑनलाईन अर्जाची मुदत वाढवावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यातील दिव्यांगांसाठी हरीत ऊर्जेवर चालणाऱ्या इ रिक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ, मुंबई यांच्या वतीने राज्यभरातील दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. सदर अर्जाची मुदत दिनांक ४ जानेवारी २०२४ ही आखेर ची मुदत देण्यात आली आहे.
यामुळे ऑनलाईन साईट जाम असल्याने अनेक दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित राहिले आहेत. म्हणून ते वंचित राहू नये म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील यांना प्रेरणा दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष निळकंठ देवराम साबणे यांच्या नेतृत्वाखाली सदर अर्जाची मुदतवाढ मिळणे कामी निवेदन देण्यात आले आहे .
दरम्यान तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सदरचे निवेदन हे वरिष्ठांना पाठवून मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निळकंठ साबणे, शिवदास खरटमल, मांगीलाल जाधव, दिलीप चव्हाण, निलेश खरटमल, आनंद शिंदे, मनीषा साबने, छाया सूर्यवंशी, माणिक चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.