जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहूनगर मधील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर एमडी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या संशयीताला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता केली. त्याच्याकडून ३ हजार रुपये किमतीचे एमडी आमली पदार्थ हस्तगत केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शाहू नगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात एक तरुण हा एमडी या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता छापा टाकून संशयित आरोपी शाहरुख सिराज भिस्ती (वय-२८) रा. शाहूनगर जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्या झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ३ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आढळून आले. ते पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख शिराज भिस्ती याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस विभागातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, रतन गीते यांनी केली आहे.