नागपुर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा| बिडगाव चौकात टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहीण भावास चिरडले. ही घटना सकाळी ९.५० वाजता घडली. यानंतर परिसरातील नागरिकांनी टिप्पर जाळत चालकाला बेदम मारहाण केली. यावेळी पोलिस वाहन आणि अग्निशमन वाहनांची तोड फोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमित कन्हैय्यालाल सैनी (वय १५, रा.अंबेनगर, पारडी) आणि अंजली सैनी (वय १८)अशी मृतक मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही चौकातुन सायकलवर जात असताना मागून भांडेवाडी येथून येणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली. त्यामुळे दोघेही जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. काही नागरिकांनी चालकास ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त नागरिकांनी टिप्परची जाळपोळ केली. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगविण्यास सुरुवात केली. मात्र, संतप्त नागरिकांनी पोलिस वाहनावर दगडफेक केली. अग्निशमन दलाच्या वाहनाची तोडफोड केली.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच सौम्य लाठीमार ही केला. त्यानंतर मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्तरीय उत्तरीय चाचणीसाठी नेण्यात आले दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती बराच काळ या परिसरात तणाव असल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता याशिवाय मृदेच्या अंत्यविधीसाठी मृतकाच्या घरी बंदोबस्त लावण्यात आला होता