महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावावर होणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील विमानतळाचं उद्घाटन ३० डिसेंबर रोजी होणार आहे, त्याचे नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम आले आहे. महर्षी वाल्मिकी हे रामायण या महाकाव्याचे निर्माते मानले जातात. त्यांच्या नावावरुन त्यांच्या ‘महर्षी वाल्मिकी’ हे नाव नव्या विमानतळाला मिळाले आहे.
या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदी येणार आहेत.
पहिले या विमानतळाचे नाव श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवण्यात आले होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राकडे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता.

Protected Content