Home Cities जळगाव रायपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत धनगर यांची निवड

रायपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत धनगर यांची निवड


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रायपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. यात उपसरपंचपदी वसंत धनगर यांची निवड करण्यात आली.

जळगाव रायपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रविण परदेशी यांनी नियमाप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेसाठी गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी ठरल्याप्रमाणे रिक्त झालेल्या जागेवर वसंत धनगर यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक सतीश परदेशी यांनी उपसरपंच पदासाठी वसंत धनगर यांच्या नावाची घोषणा केली. उपसरपंच पदी वसंत धनगर यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रजनी सपकाळे, माजी उपसरपंच प्रवीण परदेशी, ग्रामपंचायत सदस्या पुष्पाबाई परदेशी, उषाबाई परदेशी, शितल परदेशी, संगीताबाई इंगळे, ग्रामसेवक सतीश परदेशी, भीमराव धनगर, मनोज परदेशी, सुमेर परदेशी, विठ्ठल परदेशी, सिताराम परदेशी, नितीन सपकाळे यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.


Protected Content

Play sound