बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने मजूराचा मृत्यू 

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील “एमआयडीसी’ परिसरात एका बिल्डिंगचा काम सुरू असताना पहिल्या मजल्यावरून पडून मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील अंबुजा कंपनी येथे एका बिल्डिंगचा काम सुरू होता. मात्र काम सुरू असताना पहिल्या मजल्यावरून राकेश रामपत सहा (वय-३३) रा. भगवतिया राज्य बिहार, हा मजूर पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. सदर घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली होती. घटना घडताच त्यांच्यावर चाळीसगाव शहरातील एका रूग्णालयात औषधोपचार करून पुढील औषधोपचारासाठी वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज व सफदरजंग रूग्णालय नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले.

याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास अचानक मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content