जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाटीकाश्रम परिसरातील महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील खोटे नगरजवळील वाटीकाश्रम परिसरात शोभा प्रताप सोनवणे वय-४० या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता ते रविवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री साडेआठ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॅा दिनेश पाटील हे करीत आहे.