फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पुरातन जागृत खंडोबा देवस्थान येथे चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खंडोबा मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर श्री श्री १००८ पुरुषोत्तम दास जी महाराज यांच्या कृपा सानिध्यात सामूहिक मल्हारी सप्तशती पाठ , महाअभिषेक,हवनयुक्त तळी भरणे सोहळा चे आयोजन दि. १८डिसेंबर २०२३ सोमवार रोजी रामप्रहरी समस्त सराफ परिवारा व भाविकांतर्फे महा अभिषेक तदनंतर सकाळी १०.०० वाजता करण्यात आले असल्याची माहिती खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनदासजी महाराज यांनी दिली आहे.
याप्रसंगी भाविकांनी सोबत मल्हारी सप्तशती ग्रंथ, नित्यसेवा, आसन, जपमाळ, हळद भंडारा १२५ ग्रॅम, एक खोबरे वाटी, पिवळी फुले, १०८ बेलपत्र, नैवेद्य म्हणून बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, तांदूळ १२५ ग्रॅम, महामृत्युंजय यंत्र(मल्हारी सप्तशती ग्रंथ महामृत्युजंय यंत्र इ. साहीत्य कार्यक्रम स्थळी स्टॉल वर सुद्धा मिळेल) सर्वांनी भरीत व भाकरी चां नैवेद्य जास्त आणावा. त्यामुळे आपल्याला अन्नदानाचे पुण्य चंपाषष्ठीच्या दिवशी केल्याचे मिळेल व सेवा पण घडेल.
याप्रसंगी दिवसभर पूजा विधि भजन संकीर्तन सह सामूहिक भंडाराचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात फैजपूर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पवनदास महाराज व आयोजकांनी केले आहे.