Home Cities भुसावळ भुसावळात कॉंग्रेस खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याचे दहन

भुसावळात कॉंग्रेस खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याचे दहन


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले कॉंग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात आज भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.

कॉंग्रेस नेते धीरज प्रसाद साहू यांच्या विरोधात राज्यभरात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं असून भुसावळ मध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीने धीरज प्रसाद साहू यांच्या प्रत्येकात्मक पुतळ्याला झोडी मारून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. धीरज साहू यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती सापडल्याने भाजप महिला मोर्चाच्या वतीने कॉंग्रेस सह धीरज साहू यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत कॉंग्रेसचा तीव्र दिशेत व्यक्त केला असून धीरज शाहू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

या आंदोलनात भारतीय जनता महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत खासदार साहू यांच्या प्रतिकामत्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.


Protected Content

Play sound