जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे सुरु असलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथास्थळी सोनपोत लांबविण्याच्या प्रकारणात ३७ महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कोठडी संपल्यानंतर सर्वांना शनिवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ श्री शिवमहापुराण कथा सुरु आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी ५ डिसेंबर रोजी रेकॉर्डब्रेक गर्दी पहायला मिळाले. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत संशयितरित्या फिरणाऱ्या २७ महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून तीन सोनसाखळ्या आणि रोकडसह मोबाईल हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील १० जणांची टोळी जेरबंद करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील संशयितांना ९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तपासाधिकारी नयन पाटील यांनी पुन्हा संशयित आरोपींना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्वांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.