धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या विवाहितेला नवीन रिक्षा व टिव्ही घेण्यासाठी २ लाखांची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या शेख रूखसानाबी शेख समीर वय-२२ यांचा विवाह छत्रपती संभाजी नगरातील येथील शेख समीर शेख नजीर यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती शेख समीर याने घरात टीव्ही घेण्यासाठी आणि नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेराहून २ लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही याचा राग आल्याने तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पाळधी येथे निघून आल्या. गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती शेख समीर शेख नजीर, सासरे शेख नजीर, सासू जरीनाबी शेख नजीर आणि दीर शेख नावेद शेख नजीर सर्व रा. छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.