Home क्राईम चोरीची दुचाकीसह चोरट्याला अटक; बाजारपेठ पोलीसांची कारवाई

चोरीची दुचाकीसह चोरट्याला अटक; बाजारपेठ पोलीसांची कारवाई


भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील नवजीवन क्लिनिकच्या पाठीमागे पार्किंगला लावलेली दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांनी मामाजी टॉकीज परिसरातून भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी 7 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. मेघराज चंदू भोई रा.गवळीवाडा, मामाजी टॉकीज, भुसावळ असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरात राहणाऱ्या सीमा रवींद्र पाटील यांची दुचाकी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी नवजीवन क्लिनिक परिसरातून चोरून नेली होती. दुचाकी चोरी झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही दुचाकी संशयित आरोपी मेघराज भोई याने चोरून येण्याची माहिती भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गुरुवारी 7डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरातून संशयित आरोपी मेघराज भोई याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी (एमएच १९ बीएच ८९८) ही हस्तगत केली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याचे शोध पथकातील सपोनि हरिष भोये, पोउनि मंगेश जाधव, पोहेकॉ रमण सुरळकर, पोहेकॉ उमाकांत पाटील, निलेश चौधरी, समाधान पाटील, प्रशांत परदेशी योगेश माळी, अमर अढाळे यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound