जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नावानचे बनावट व्हॉटस्-अप अकाउंट तयार करण्यात आले आहे.
याबाबत नागरिकांनी आणि खास करून विदयार्थ्यांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रा. माहेश्वरी यांच्या नावाचा बनावट व्हॉटस्-अप अकाउंट तयार करण्यात आले आहे.
त्यावर प्रा. माहेश्वरी यांचे छायाचित्र आहे. वास्तविक, हा क्रमांक प्रा. माहेश्वरी यांचा नाही. या क्रमांकावरून काही संदेश आल्यास अथवा पैशाची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.