Home क्राईम जळगावात तरूणाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

जळगावात तरूणाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तिजोरी गल्लीतील काशिनाथ हॉटेलजवळून तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील अज्ञात दोन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना रविवार ३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवार ४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अली हुसेन शेख अंबर अली वय-३१ रा. पश्चिम बंगाल ह.मु. जोशी पेठ, बागवान गल्ली, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेख अली हुसेन शेख हा एसी रिपेअरींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार ३ डिसेबर रोजी रात्री ९ वाजता तिजोरी गल्लीतील काशिनाथ हॉटेल जवळून पायी जात असतांना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून येवून त्याच्या हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला. त्याने दोघांचा पाठलाग केला तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले. त्याने तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सोमवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.


Protected Content

Play sound