चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेच्या नियोजनासाठी आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.
मनोज जरांगे पाटील यांची जाहीर विराट सभा दि ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नारायणदास अग्रवाल क्रीडा संकुल ,मोठ्या कॉलेजचे ग्राउंड , करगाव रोड चाळीसगाव येथे होणार आहे. या सभेला चाळीसगाव सह भडगाव, पाचोरा, पारोळा ,अमळनेर ,कन्नड, नांदगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव व भगिनी जवळपास एक लाखच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.
सभेच्या नियोजन यावेळी करण्यात आले, सकल मराठा समाजाची नारायणदास अग्रवाल क्रिडा संकुल येथे दि २ रोजी बैठकीत ग्रामीण व शहरातील सर्व मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.