Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 4 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.


Protected Content

Play sound