Home Cities एरंडोल कासोद्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थांचे स्वागत

कासोद्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थांचे स्वागत

0
119
8af437a6 cb6d 4941 b767 2fad162481de
8af437a6 cb6d 4941 b767 2fad162481de


8af437a6 cb6d 4941 b767 2fad162481de

कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) येथील साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा विद्यालयात सोमवारी शाळा सुरू होण्याच्या पहील्या दिवशी विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्वागत व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार प्रमोद पाटील होते. विद्यालयाचे प्राचार्य जी के.सावंत, विद्यालयाचे माजी प्राचार्य सी.जी.पाटील, प्रशांत पाटील, जळू येथील गुलाबसिंग पाटील, महेंद्रसिंग पाटील, कासोदा येथील यशवंत देसले, वाल्मिक पाटील, संतोष चौधरी, मालखेडा येथील गोपीचंद पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके व मिठाई देखील देण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि परीसरातील अनेक पालक उपस्थित होते .


Protected Content

Play sound