चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावात माहेर असलेल्या एका विवाहितेला पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात माहेर असलेल्या २९ वर्षीय महिलेचा प्रल्हाद अनमोल पवार (रा. कोल्हे नगर, जळगाव) यांच्याशी ८ मे २०१५ रोजी विवाह झाला. सुरूवातीला चार महिने पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये सांगत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ होऊ लागली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पती प्रल्हाद अनमोल पवार, सासरे अनमोल भिला पवार, सासु सुमित्राबाई अनमोल पवार (सर्व रा.कोल्हे नगर, जळगाव ) व नंनद राजश्री किरण चव्हाण, नंदोई किरण चत्रू चव्हाण (रा. आदर्श नगर, जळगाव) आदींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सफौ राजेंद्र साळुंखे हे करीत आहे.