जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटीचे, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, येथे संविधान दिन साजरा” कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत केसीई सोसायटीचे शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव यांचे राष्ट्रीय सेवा योजना एककतर्फे महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम स्थळी महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे सर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज रविंद्र पाटील यांनी केले.