जामनेर (प्रतिनिधी)। संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशन मुक्ताईनगर यांच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी अण्णाभाऊ सुरवाडे यांना ‘खान्देश युवा लोक कलाकार गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी सास्कृतिक संगीत गायन अभिनेता या विविध क्षेत्रात त्यांनी आपली कामगिरी केलेली आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव भुसावळ येथे नाहटा कॉलेज या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रमुख अतिथी आमदार संजय सावकारे, उद्योगपती श्रीराम पाटील, अभिनेते सचिन कुमावत, माजी सभापती राजेंद्र चौधरी, जि.प. सदस्य रवींद्रनाना पाटील, संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते अभिनेता, गीतकार, पार्श्वगायक अण्णाभाऊ सुरवाडे यांना गौरविण्यात आले.