Home क्राईम वायर रोप तुटल्याने खंब्यावरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

वायर रोप तुटल्याने खंब्यावरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

0
वायर रोप तुटल्याने खंब्यावरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एमआयडीसीतील कंपनीत दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढलेला असतांना वायर रोप तुटल्यामुळे ३० वर्षीय तरूण खाली कोसळल्याने जागेवरच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  चेतन ज्ञानेश्र्वर राजपूत (वय ३०, रा. धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, धुळे येथे राहणारा चेतन राजपूत हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. विजेचे पोल उभारण्यासह इलेक्टॉनिक्सचे काम करणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडे कामाला होता. जळगाव शहरातील एमआयडीतील एस-सेक्टमधील कंपनीत दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा आला होता. मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास  विजेच्या खांबावरील दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा वायर रोप आणि शिडीच्या सहाय्याने खांबावर चढून दुरुस्ती करीत होता. अचानक वायर रोप तुटल्याने चेतन हा उंचावर असलेल्या शिडीवरुन जमिनिवर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. कंपनीतील कर्मचाऱ्यांसह चेतन सोबत काम करणाऱ्यांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहे. चेतनच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.