जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |शहरातील गुजराल पेट्रोलपंपासमोरील पुजा हॉटेल येथून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जून रविंद्र बिऱ्हाडे (वय-३३) रा. वाटिकाश्रम, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीला आहे. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळ दुचाकी (एमएच १९ बीझेड १०७४) ने भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. त्यावेळी पेट्रोलपंपासमोरील पुजा हॉटेल समोर त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. अखेर गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.