पाचोरा प्रतिनिधी । काही युवक कामानिमित्त भडगाव कडे मोटरसायकलने जात असतांना, रेल्वे पुलाजवळ तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी रस्त्यावर धुमाकूळ घातला असून कुत्रे अचानक मोटार सायकलच्या चाकामध्ये आल्याने युवकाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. ही घटना आज (17 जून) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, एमएच 19 सीसी 2496 या मोटर सायकलने जात असताना पाचोरा येथील रेल्वे पुलाजवळ तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी रस्त्यावर धुमाकूळ घातल असतांना हे कुत्रे मोटार सायकलमध्ये आल्याने युवकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून मयताचे नाव प्रभू राजाराम सिरसे (वय २३) रा.भडगाव असे आहे. प्रभू सिरसे हा भडगाव न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. घटना घडल्यानंतर बबलू मराठे यांनी अपघात झालेल्या व्यक्तीला तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यात मृत्यू घोषित करण्यात आले आहे. मयतास पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.