जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पारीख पार्क येथील परिसरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक देविदास सातोटे (वय-२८) रा. कानळदा ता.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिपक हा त्याची दुचाकी (एमएच १९ डीडी ४८८०) घेवून जळगाव शहरातील पारीख पार्क येथे आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी न मिळाल्याने सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील करीत आहे.