जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज दुसऱ्या दिवशी जामनेर शहरातील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या विद्यार्थिनी महिला व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर साखळी उपोषणाला बसलेले आहेत. यावेळी या साखळी उपोषणाला लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी पाठिंबा दिला.
याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, डॉ प्रशांत पाटील, राहूल चव्हाण, प्रदीप गायके यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सांगितले की, मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करीत असून त्यांच्या जीवाची खेळ खेळण्याचे काम सरकार करीत आहे मात्र आता तात्काळ मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे व सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे. त्याचबरोबर मला मनोज जरांगे यांचा उपोषण सोडवावा, जर मनोज रंगीला काही बरे वाईट झाले तर आता सरकारवर कलम ३०२ च्या गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. येणाऱ्या काळात जर सरकारने मराठा समाजाला न्याय दिला नाही तर सरकारमधील भारतीय जनता पार्टी शिंदे गट व अजित पवार गट यांच्या मंत्र्यांना व पुढार्यांना गावात गावात फिरू देणार नाही, असा इशारा आपले प्रतिक्रिया देताना दिला आहे.